Nanded crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: संतापजनक! १६ वर्षीय मुलीवर उपसरपंचाकडून बलात्कार, संबंधातून बाळाला दिला जन्म, पण नराधमाने तेही विकलं

Nanded crime 16 year old girl physical assault by a sub sarpanch: नांदेडमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका १६ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय नराधम उपसरपंचाने बलात्कार केला आहे.

Bhagyashree Kamble

नांदेडमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका १६ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय नराधम उपसरपंचाने बलात्कार केला आहे. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, तिने महिन्याभरापूर्वी एका मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण दाबवण्यासाठी नराधमाने बाळाला विकल्याचा संशय निर्माण झाला आहे. यावरून ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नरधमाला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

उपसरपंचाचा विकृत चेहरा समोर

नांदेडमधील एका नराधमाने १६ वर्षीय मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. नराधम हा गावातील उपसरपंच असून, बाबुराव तुपेकर असे नराधम उपसरपंचाचं नाव आहे. वर्षभरापूर्वी या नराधमाने मुलीला गुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्या. नंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. नराधम वारंवार मुलीबरोबर लैंगिक अत्याचार करत होता. यातून मुलगी गरोदर राहिल्याची माहिती आहे.

गरोदर राहिल्यानंतर महिन्याभरापूर्वी तिची प्रसूती करण्यात आली. तिला मुलगी झाली. हे प्रकरण दाबण्यासाठी नराधमाने एक शक्कल लढवली. त्याने थेट मुलीला विकल्याचा संशय पीडित महिलेने उपस्थित केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट उपसंरपंचाची चौकशी करण्यास सुरूवात केली.

नराधम उपसरपंचाला तामसा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT