नांदेडमध्ये दोन जणांना ‘डेल्टा प्लस’ची लागण Saam Tv
महाराष्ट्र

नांदेडमध्ये दोन जणांना ‘डेल्टा प्लस’ची लागण

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना, डेल्टा प्लसचा शिरकाव आता नांदेडमध्ये सुरु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड : नांदेड Nanded जिल्ह्यात कोरोनाचा Corona प्रभाव कमी होत असताना, डेल्टा प्लसचा Delta Plus शिरकाव आता नांदेडमध्ये सुरु झाला आहे. २ महिला रुग्णांना डेल्टा प्लस झाल्याचे अहवाल काल प्राप्त झाला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्याने नांदेडकरांनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडकरांना आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे.

हे देखील पहा-

रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येला थोड्या प्रमाणात ब्रेक Break लागलेला आहे, असे असतानाच कोरोनाबाधित असलेल्या, २ महिलांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवाल रुग्णालय Hospital प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. यामध्ये नवीन नांदेड हडको Hudco परिसरामध्ये एका १९ वर्षीय महिलेसह लोहा या ठिकाणी असलेली ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

काही रुग्णांचे स्राव नमुने विषाणुच्या जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नित्याने प्रयोगशालेय सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था, इन्स्टिटय़ूट ऑफ जिनेमिक अँड इंटिग्रेटेड बॉयोलाजी या संस्थांना हे अहवाल पाठविण्यात आले आहे. २४ जून दिवशी हडको या ठिकाणी एक १९ वर्षीय महिला आणि २ जुलै दिवशी लोहा येथील एक ३८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. सदरील प्रयोगशालीय सर्वेक्षणामध्ये या २ महिलांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अहवाल राज्यस्तरावरून नुकतेच प्राप्त झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT