Mango Saam tv
महाराष्ट्र

Akshaya Tritiya: नांदेडात देवगडचा आंबा वधारला; अमरावतीत मटक्याची बाजारपेठ फुलली

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेकजण हापूस आंबा खरेदी करताना दिसत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संताेष जाेशी / अमर घटारे

नांदेड / अमरावती : अक्षय तृतीयाच्या (akshaya tritiya 2022) मुहूर्तावर आज राज्यभरात आंबा (mango) खरेदीसाठी तसेच विविध वस्तु खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी हाेऊ लागली आहे. नांदेड (nanded), अमरावती (amravati) येथील बाजारपेठेत आज नागरिकांची आंबा खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. (akshaya tritiya latest marathi news)

नांदेडला आंबा खरेदीस गर्दी

नांदेडच्या फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. आंबा खरेदीसाठी नागरिकांनी सकाळ पासूनच गर्दी केली आहे. यंदा मात्र बाजारात गावरान आंबा फारसा दाखल झालेला नाही असे विक्रेत्यांनी सांगितले. केशर, दशेरी, लालबाग, मलगोबा, निलम असे चार पाच प्रकारचा आंबा बाजारात उपलब्ध आहेत. यंदा आंब्याचा भाव ६० ते जास्तीत जास्त १२० रूपये प्रति किलो आहे. कोकणातील देवगडच्या आंब्याला मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. आंबा महाग असला तरी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेकजण हापूस आंबा खरेदी करताना दिसत आहेत.

अमरावती बाजारपेठ नागरिकांनी फुलली

कोरोनाच्या संकट कमी झाल्याने दाेन वर्षानंतर पहिल्यांदाच अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहाने नागरिक साजरा करीत आहेत. एप्रिल महिन्यापासून राज्य मास्कमुक्त झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमासाठी वस्तु खरेदी करताना नागरिक दिसत आहे.

अमरावती बाजारपेठेत अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पूजनासाठी मटक्याच मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. त्याची पूजा केली जाते. त्यासाठी मटके खरेदी करण्यासाठी अमरावतीमधील छोट्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. यामुळे छोटे व्यापारीसुध्दा आनंदी झाल्याचे पहायला मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT