Thackeray Group Shiv Sena Nanded City Cheif Kidnap: Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: मोठी बातमी! नांदेडच्या ठाकरे गट सेनेच्या शहर प्रमुखाचं अपहरण

Thackeray Group Shiv Sena Nanded City Cheif Kidnap: ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुखाचं अपहरण झाल्याची घटना घडलीय. नांदेडमधील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेड येथील ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुखाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे. गौरव कोटगिरे असे या शहर प्रमुखाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. कोटगिरे यांची पत्नी आणि त्यांचा ड्रायव्हर याचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. अपहरणाची पुन्हा एका घटना घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. ठाकरे गट शिवसेनेचे शहर प्रमुखाचं अपहरण झाल्याची घटना घडलीय. गेल्या काही दिवसांपासून अपहरण आणि हत्याच्या घटना घडत असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कोटगिरे असे ठाकरे गट शिवसेनेचे शहर प्रमुखाचे नाव आहे. अपहरण झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोटगिरे यांच्या पत्नी आणि ड्रायव्हर याचा जबाब नोंदवला जात आहे. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड शहरातील बाफना टी पाईंटवरून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोटगिरे यांचे अपहरण झाल्याचं सांगितले जात आहे. कोटगिरे हे कट्टर शिवसैनिक असून ते सोशल मीडियावर ही सक्रिय असतात. नांदेड शहर उत्तर आणि दक्षिण या विधानसभा मतदारसंघातदेखील ते सक्रिय होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT