Gujarat Accident News  saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News : नांदेडमध्ये भीषण अपघात; कार - दुचाकीच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू

Accident In Nanded : नांदेड जिल्ह्यात दोन तरूणांचा अपघाती मृत्यू झालाय. दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nanded Accident Car Hit Bike

राज्यात अलीकडे अपघातांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत. भरधाव वेगात वाहनं चालविल्यानं या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. बुधवारी रात्री नांदेडमधून असाच एक भीषण अपघात समोर आलाय. (latest accident news)

दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटीवरून जाणाऱ्या दोन तरूणांचा मृत्यू झालाय. हा अपघात रात्री साडे अकराच्या दरम्यान अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील श्रीसंत किसन बापू आश्रमाजवळ घडला आहे. या अपघातात (accident) नांदेड शहरातील किशन मोरे आणि हरिश गट्टाणी या तरुणांचा मृत्यू झालाय.

अशी घडली घटना

हे दोघेजण रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने पार्डीकडून अर्धापुरकडे येत होते. श्रीसंत किशनबापू आश्रमाजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक (Nanded News) दिली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. अपघात एवढा भीषण होता की, कारच्या धडकेत स्कूटीचा चक्काचूर होवून तिने पेट घेतला. स्कूटी जळून खाक झाली होती.

अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या दोन तरूणांवर काळाने घाला घातल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. हे दोन्ही तरूण मंडप व्यावसायिक असल्याची माहिती मिळतेय. (accident news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT