Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident : उपचारासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राचा वाटेतच मृत्यू; ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झाला अपघात

Nanded News : वडील दाजीबा गाढे यांना उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात नेत होते. आसना पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव आयचर गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: वडिलांची तब्बेत चांगली नसल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी मुलगा दुचाकीवरून घेऊन जात होता. मात्र रस्त्यातच काळाने झडप घातली. ट्रकने दिलेल्या धडकेत बदल व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Nanded) नांदेड- नागपूर मार्गावर घडली. (Maharashtra News)

अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील गोपीनाथ गाढे (वय ४०) व वडील दाजीबा गाढे (वय ६५) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या दोघांचे नाव आहे. नांदेड - नागपुर महामार्गावरील आसना पुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बाप- लेकाचा मृत्यु (Death) झाला. आज सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला. भोगाव (ता. अर्धापूर) येथील गोपीनाथ गाढे (वय ४०) हे आपले वडील दाजीबा गाढे यांना उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात नेत होते. आसना पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव आयचर गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरातील कर्ते पुरुष गेले 

धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर मागे बसलेले दाजीबा गाढे हे पुलावरून थेट खाली कोरड्या नदीपात्रात कोसळले. तर त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांना तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण दोघानाही मृत घोषित करण्यात आले. घरातील करत्या शेतकरी पिता- पुत्राचा दुर्दैवी मृत्यूने घरावरचे छत्र उडाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elections : निवडणुका येताच भाजपनं टाकला पहिला डाव; मुख्यमंत्र्यांचा प्लान ठरला, VIDEO

Friday Horoscope : गणरायांची कृपा होणार; अचानक धनलाभाचा योग; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Dry Skin Care: बदलत्या वातावरणामुळे चेहरा ड्राय आणि डल पडला आहे? मग रोज करा हा साधा घरगुती उपाय

RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

SCROLL FOR NEXT