Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident : मुखेडजवळ एसटी बस अन् ट्रक कंटेनरचा भीषण अपघात, ९ प्रवासी जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या केबिनसह समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

संतोष जोशी

Nanded Accident News : नांदेड जिल्ह्यातील मुखेड - लातूर महामार्गावर कंटेनर आणि महामंडळच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात काल (३ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास दबडे शिरुर पाटी जवळ झाला आहे. या अपघातात ९ प्रवासी जखमी झाले असून त्यात दोन अतीगंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघात होताच कंटेनर चालक फरार झाला. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता की बसची समोरची बाजू चक्काचूर झाली आहे. अपघातील जखमींना सुरवातीला मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र नंतर पुढील उपचारांसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे.

मुखेड आगाराची बस मुखेड कडे येत होती तर लातूरच्या दिशेने ट्रककंटेनर जात असताना मुखेड होऊन चार किलोमीटरच्या अंतरावरील लातूर राज्य महामार्गावरील शिरूर दबडे पाटीच्या वळणावर दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या केबिनसह समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपसोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? नाना पटोलेंच्या वक्तव्याने विषय संपला

Mumbai : मुंबई लोकलमध्ये पॉवर बँकचा अचानक स्फोट! बॅगला आग लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Island Forts : चारही बाजूंनी पाणी अन्...; बेटांवर असलेले जगातील ७ रहस्यमय किल्ले, भव्यता पाहून व्हाल थक्क

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT