Nanded Family Murder Case News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : आई-बापाची हत्या केली, २ भावांनीही आयुष्य संपवलं; नांदेडमधील चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडले, कारण वाचून धक्का बसेल

Nanded Family Murder Case News : नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येचं गूढं आलं समोर. पोटच्या मुलांनी आई वडिलांची हत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याचे उघडं झाले आहे. या घटनेने जिल्ह्यांत खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • मुखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 मृतदेह 2 वेगवेगळ्या ठिकाणी सापडले

  • शवविच्छेदनाने आई-वडिलांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे सिद्ध

  • पोटच्या २ मुलांनीच आई-वडिलांची हत्या केली

  • उपचार खर्च आणि आर्थिक ताण हे हत्येमागील प्रमुख कारण

संजय सूर्यवंशी, नांदेड

काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र आता जिल्ह्यात झालेल्या या एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. स्वतःच्या पोटच्या मुलांनीच आई-वडिलांचा गळा दाबून हत्या करून नंतर स्वतः देखील आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या मृत आई-वडिलांच्या शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण उघडकीस आले.

मुखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे २५ डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते. ५१ वर्षीय रमेश लखे आणि त्यांची पत्नी ४४ वर्षीय राधा लखे या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. तर २५ वर्षीय उमेश लखे आणि त्याचा भाऊ २२ वर्षीय बजरंग लखे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर आढळले होते.

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मात्र या तपासादरम्यान रमेश लखे आणि राधा लखे यांचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. इतर तांत्रिक तपास केला असता मुलांनी अगोदर आई-वडिलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

वडील रमेश लखे हे २५ वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सततच्या खर्चाला कंटाळून दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा गळा दाबून हत्या केल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नातलगांच्या तक्रारीवरून याप्रकरणी दोन्ही मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींनी ही आत्महत्या केल्याने याप्रकरणी कुठलीही चार शीट न्यायालयात दाखल न करता अवेटेड समरी दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT