Fire saam tv
महाराष्ट्र

Navapur: गोडाऊनला भीषण आग; इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कोळसा, अग्निशमन दलाचा एक जवान जखमी

इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनला भीषण आग; इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कोळसा, अग्निशमन दलाचा एक जवान जखमी

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान व गोडाऊनला सकाळी साडेपाचच्‍या सुमारास भीषण आग लागली. आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत टीव्ही, फ्रिजसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कोळसा झाला आहे. (nanadurbar news fire at an electronics godown Electronic goods coal a firefighter injured)

नवापूर (Navapur) शहरातील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची धावपळ उडाली. दुकानमालक हेमंत सोनवणे यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी शंभर मीटर अंतरावर असलेल्या पोलीस (Police) स्टेशनला धाव घेतली त्यांनी अग्निशमन दलाला फोन करायला लावला असता फोन बंद येत असल्याने त्यांना प्रत्यक्ष जावे लागले. त्यानंतर चालक उपलब्ध नसल्याने अर्धा तास उशिराने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील लाखो रुपयांचा सामान जळून खाक झाला आहे.

गुजरातचे अग्निशमन दल दाखल

आग विझवण्यासाठी नवापूर, नंदुरबार (Nandurbar) आणि गुजरात (Gujrat) राज्यातील जवळील सोनगड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) वतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहे, परंतु भीषण आगीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील टीव्ही फ्रिजसह लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाचा जवान जखमी

आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी नवापूर पोलीस व स्थानिक प्रशासन दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सदर दुकान व गोडावूनात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT