Sanjay Kute Saam Tv
महाराष्ट्र

नाना पटोले हे स्वतःहून भाजपात येतील, पण आम्ही घेणार नाही - संजय कुटे

"उद्धव ठाकरेंची शिवसेना ही पवार साहेबांची शिवसेना"

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा - नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये यावं अशी ऑफर देणारे काँग्रेसचे (Congress) नाना पटोले (Nana Patole) हेच काही दिवसांनी भाजपात येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री संजय कुटे (Sanjay Kute) यांनी लगावला आहे. नितीन गडकरींसारख्या नेत्यावर बोलण्याची नाना पटोले यांची कुवतच नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. काल अकोला येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरबद्दल ते शेगावात पत्रकारांशी बोलत होते.

तर आगामी सगळ्या निवडणुका आम्ही एकत्रपणे लढू आणि त्यावर जिंकू असे जाहीर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी शेगावात जाहीर केले,यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांची शिवसेना आहे. तर शिंदे गटातील शिवसेना ही अस्सल बाळासाहेबांची शिवसेना असल्याची टीका देखील केली.

हे देखील पाहा -

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शिंदे गट शिवसेनेतील खासदार प्रतापराव जाधव, सर्व आमदार आणि भाजपचे सर्व आमदार यांची आगामी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात संयुक्त बैठक घेतली. व बैठकीनंतर आगामी निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गट शिवसेना युती झाल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी जाहीर केले.

भाजपा आणि शिंदे गटाच्या बैठकीला खासदार भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महल्ले, आमदार संजय रायमुलकर यांच्या सहा जिल्ह्यातील सर्व माजी आमदार यांची उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT