Nana Patole/Helicopter Saam TV
महाराष्ट्र

चिमुरडीच्या उपचारासाठी नानांनी आई-लेकीला पाठवलं हेलिकॉप्टरमधून, स्वतः गेले रेल्वेने (पहा Video)

उंजल दासी या लहान मुलीला हृदयविकाराचा आजार असून मुंबईला उपचारासाठी तिला तात्काळ जायचं होतं.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या नियोजिक दौऱ्याला कांही कारणामुळे विलंब झाला, मात्र नानांना झालेला हा विलंब एका चिमुरडीसाठी वरदान ठरलं आहे. नाना पटोले हे ज्या हेलिकॉप्टरने (Helicopter) आज मुंबईला जाणार होते त्याच हेलिकॉप्टरने सोलापुरातील (Solapur) उंजल दासी ही तिच्या आईसोबत मुंबईला रवाना झाली आहे.

उंजल दासी (Unjal Dasi) या लहान मुलीला हृदयविकाराचा आजार असून मुंबईला उपचारासाठी तिला तात्काळ जायचं होतं. ही गोष्ट सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना समजताच शिंदे यांच्या पुढाकाराने उंचल ला हेलिकॉप्टरने पाठविण्यात आले.

पहा व्हिडीओ -

उंजल हिला हृदयविकाराचा आजार असून, तिच्यावर तात्काळ उपचार करण गरजेचं होत, त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेंनी विनंती केल्यानंतर नांनांनी (Nana Patole) हेलिकॉप्टर चिमुरडीला देऊन स्वतः रेल्वेने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नेहमी स्वतःचा धडाकेबाज अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाना पटोलेंचा ही हळवी बाजू ही आता समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT