Nana Patole, Congress, Solapur, siddheshwar sugar factory cogeneration chimney demolition Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News : हे तर साले नालायक लाेक आहेत, त्यांची नियतीच ती आहे : नाना पटाेले

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या (siddheshwar sugar factory solapur) राजकीय चिमणीचा काल अंत झाला. कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चिमणी पाडकामासंदर्भात भाजपने भूमिका स्पष्ट केली नाहीये तर चिमणी पाडकामावरून काँग्रेसने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (Maharashtra News)

आज (शुक्रवार) काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मराज काडादी यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोनवरून धर्मराज काडादी यांना दिलासा दिलाय. नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (siddheshwar sugar factory cogeneration chimney demolition latest update)

नाना पटोले (nana patole) म्हणाले "राज्य सरकारने चिमणी पाडली तर त्यांना पाडू..., व्यक्तीदोषातून हा प्रकार झाला आहे असे कडादींनी नमूद करताच पटाेलेंनी हे तर साले नालायक लोक आहेत, त्यांची नियतच ती आहे. त्यांना माणुसकी नावाचा प्रकार नाही. काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे." असेही पटाेलेंनी नमूद केले.

दरम्यान नाना पटोले हे कडादी यांची येत्या 23 जूनला साेलापूरात भेट घेण्याची शक्यता आहे. चिमणीवरून आता राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT