Nalasopara Crime Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara Crime : गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी नव्हते पैसे; बांधकाम ठेकेदाराच्या घरी जात केलं भयानक कृत्य

Nalasopara News : नालासोपारा येथे आल्यानंतर त्याने हे सर्व पैसे जुगारात लावले व यात तो हरला होता. यामुळे त्याच्याजवळ वाराणसीला परत जाण्यासाठी देखील पैसे नव्हते

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 
नालासोपारा
: पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एका बांधकाम ठेकेदाराची झालेल्या हत्येची घटना घडली होती. या घटनेचा उलगडा करण्यात युनिट ३ च्या पोलिसांना यश आले आहे. गहाण ठेवलेली दुचाकी सोडविण्यासाठी बांधकाम ठेकेदाराची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे. 

वाराणसी येथे राहणारा समीर कुमार बिंद हा संशयित आरोपी कामानिमित्ताने (Nalasopara) नालासोपारा परिसरात आला होता. त्याने वाराणसीहून येताना आपली दुचाकी २५ हजार रुपयांत गहाण ठेवली होती. नालासोपारा येथे आल्यानंतर त्याने हे सर्व पैसे जुगारात लावले व यात तो हरला होता. यामुळे त्याच्याजवळ वाराणसीला परत जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. 

पुन्हा वाराणसी येथे त्याला जायचे व गहाण ठेवलेली दुचाकी सोडवायसाठी पैसे नव्हते. दरम्यान त्याच्या ओळखीचा ठेकेदार प्रमोद कुमार बींद याकडे कायम पैसे असायचे, हे त्याला माहीत होते. त्यामुळे समीर बिंद हा (Crime News) बांधकाम ठेकेदाराच्या घरी गेला व त्याची हत्या केली. तसेच त्याकडे असलेले पैसे घेऊन पळ काढला होता. या घटनेबाबत तपस करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीने मीरा- भाईंदर पोलिसांच्या क्राईम युनिट ३ च्या पोलिसांनी संशयित आरोपीला वाराणसी येथून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT