Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : UPSC पास, पोस्टात वरिष्ठ संचालक, ५ महिन्यांपूर्वी निधन, वरिष्ठांच्या छळामुळं मृत्यू झाल्याचा पतीचा खळबळजनक आरोप

Nagpur News : नागपूर येथील टपाल खात्यात वरिष्ठ संचालक असलेल्या वासुंधरा गुल्हाने-मिठे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पतीने पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला असून केंद्रीय मंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

टपाल खात्यातील महिला अधिकारी वासुंधरा गुल्हाने-मिठे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

पतीने पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्यावर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला

मृत्यूचे कारण आटो इम्युनिटी डिसऑर्डर असल्याचं सांगण्यात आलं

केंद्रीय मंत्र्यांकडे न्याय मागणी सुरु आहे

टपाल खात्यात वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा मे महिन्यात नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र या महिला अधिकाऱ्यांच्या पतीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या छळामुळे आटो ह्युंमन डीस ऑर्डर झाला आणि यात त्यांचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे.

मुळच्या वर्ध्याचे असलेल्या महिला अधिकारी वासुंधरा गुल्हाने - मिठे या २०१४ च्या बॅचमधील यु पी एस सी पास आउट होत्या. महिला अधिकारी शोभा मधाळे टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत आहे. पाच दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जागेसाठी दोन महिला अधिकाऱ्याची धुसफूस समोर आली. त्यात ही महिला अधिकारी शोभा मधाळे देखील दिसून आली.

टपाल खात्यात उच्च अधिकारी असलेल्या वसुंधरा गुल्हाने - मिठे यांनी नागपूर येथे २०२४ च्या जानेवारी महिन्यात संचालक म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून पोस्ट मास्टर जनरल यांच्याकडून वारंवार अपमान, टोचून बोलणे, मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या त्रासामुळे वसुंधरा यांना आटो इम्युनिटी डिसऑर्डर आजार झाला. ७ मे २०२५ रोजी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. १६ मे २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मृत महिला अधिकाऱ्यांच्या पतीचे नेमकं म्हणणं काय ?

वसुंधरा मोठे यांच्या मृत्यूला कारणीभूत टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल अधिकारी असलेली महिला असल्याचा आरोप वसुंधरा यांच्या पतीने केला. ते म्हणाले, "माझ्या पत्नीचा मृत्यू वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या मानसिक छळा मुळे झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांना मी पुराव्यानीशी ई मेल करून न्याय मागितला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतीरादित्य शिंदे यांना देखील मेल करून न्याय मागितला आहे. पण अद्याप मला न्याय मिळाला नाही." असे ते म्हणाले. शिवाय शोभा मधाळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांची मंचावरील धुसपूस सगळीकडे व्हायरल झाली होती. यातील एक अधिकारी या शोभा मधाळे या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोभा मधळे या चर्चेत आल्या आणी ते नेहमीच वादात राहत असल्याचा आरोप पुष्पक मोठे यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT