Nagpur News Saam TV News
महाराष्ट्र

Nagpur: खेळता-खेळता उघड्या चेंबरमध्ये पडली, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; आई वडिलांचे रडून रडून हाल

18-month-old girl dies after falling into open drain: नागपूरच्या भांडवाडी परिसरात उघड्या चेंबरमध्ये पडून १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Bhagyashree Kamble

पराग ढोबळे, साम टीव्ही

उघड्या चेंबरमध्ये पडून १८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या भांडवाडी परिसरातून उघडकीस आली आहे. चेंबरमध्ये ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आई वडिलांनी तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देवांशी श्याम साहू असं १८ महिन्यांच्या मृत मुलीचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घराबाहेरील चेंबर उघडं होतं. देवांशी खेळत असताना त्या उघड्या चेंबरमध्ये पडली. चेंबरमध्ये पडल्यानंतर ती जोरजोरात ओरडू लागली. मात्र, काही क्षणात घाबरून ती चेंबरमध्येच पडली. घरच्यांनी तिला तातडीने बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू होते.

मात्र, उपचारादरम्यान सायंकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. देवांशीचं कुटुंब बांधकामासाठी नागपुरात आलेलं असून भांडवाडी परिसरात राहत होते. घराचं काम सुरू असल्यामुळे साहू कुटुंब कामगार म्हणून त्या परिसरात वास्तव्यास असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

पिंपरी-चिंचवड शहरातील चरोहली परिसरामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत मृतदेह आढळला. चरोहली परिसरातील तापकीर मळा या ठिकाणी एका विहिरीमध्ये मुलीचा विहिरीत आढळला. वैष्णवी इंगवले असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने वैष्णवी इंगवले हिचा मृतदेह विहिरीतून काढून दिघी पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या वैष्णवी इंगवले हिने आत्महत्या केली की हत्या झाली, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT