Nagpur Earthquake News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Earthquake: दिवाळीत नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

Nagpur News: नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दिवाळीच्या दिवशी दुपारच्या सुमारास नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

दिवाळीमध्ये नागपूर भूकंपाच्या धक्क्याने हादरले. नागपूर जिल्ह्यात भूकंपाची सौम्य नोंद झाली. आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के नागपूरकरांना जाणवले. अचानक भूकंपाचा धक्का बसल्यामुळे नागपूरकर घाबरले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता.या भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. या भूकंपाची नोंद रिव्ह्यूड म्हणजेच तपासून निश्चित केलेली आहे.

कमी तीव्रतेच्या भूकंपांमुळे अनेकदा खूप सौम्य हादरे बसतात जे दैनंदिन व्यवहारांमध्ये कधीकधी जाणवणे कठीण असते. सध्या तरी नागपूर शहर किंवा जिल्ह्यातील ज्या विशिष्ट भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक तीव्रतेने जाणवले त्या भागांमध्ये किती नुकसान झाले याची माहिती समोर आली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये आलेल्या भूकंपाची नोंद ३.४ रिस्टल स्केल एवढी करण्यात आली होती. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झालं होतं. नाशिक आणि गुजरातच्या परिसरात भूगर्भात सुरू असलेल्या हालचालींमुळे नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली होती. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात दोन ते तीन वेळा सौम्य भूंकपांचे धक्के जाणावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

Weather Update: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; ६ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Sunday Horoscope: आज कोणाला मिळणार पैशांचा फायदा, कोणाच्या आयुष्यात फुलणार प्रेम? वाचा राशिभविष्य

महाराष्ट्रात पुन्हा खंजीर, पुन्हा गद्दारी? 'पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; वडेट्टीवारांचा घणाघात

पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेसेनेचं आव्हान, डिलिमिटेशनवरून ठाकरे विरुद्ध पवार

SCROLL FOR NEXT