Nagpur Police Constable Sucide News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : धक्कादायक! नागपुरात पोलीस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur Police Constable Sucide News : नागपुरात पोलीस कॉन्स्टेबलने कौटुंबिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील घटनेनंतर पोलिस दलातील मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Alisha Khedekar

  • नागपुरात पोलीस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

  • कौटुंबिक तणाव आणि नैराश्य कारणीभूत

  • सध्या रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर

  • मुंबईतील घटनेनंतर पोलिस मानसिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर

  • पोलिस दलात तणाव व्यवस्थापनाची गरज अधोरेखित

Nagpur Police Constable Jayant Jhode Sucide Attempt मुंबईत काही दिवसांपूर्वी एका तरुण पोलीस कॉन्स्टेबलने नैराश्येतून आणि तणावातून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये देखील एका पोलीस कॉन्स्टेबलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकाराने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत झोडे (रा. उमरेड) असे पोलिस शिपायाचे नाव आहे. गेले अनेक दिवस झोडे यांचा पत्नीशी नियमित वाद होत होता. सतत होणाऱ्या भांडणातून आणि तणावातून झोडे नैराश्येत होते. या नैराश्येतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. रविवारी घरी कोणीही नसताना पोलीस कॉन्स्टेबल झोडे यांनी विष पिऊन आत्महत्या केली.

ही बाब लक्षात येताच शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या पोलीस हवालदाराला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झोडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली घेतली असून पोलिस तपास करीत आहेत.

मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबलने का केली आत्महत्या?

एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिपाई मुंबई पोलीस दलात नुकताच भरती झाला होता. त्याच्या प्रेयसीच्या आईने "जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू," अशा शब्दांत दिलेल्या धमकीमुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

Crime: विमान प्रवासात महिलेवर बलात्कार, भारतीय नागरिकाला अटक

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT