Police constable bike hit glass shattered couple in car Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Crime : ये बाहेर निघ...; कार रिव्हर्स घेताना बाईकला धडक, पोलीस कर्मचाऱ्याची काचा फोडत कपलला शिवीगाळ; VIDEO व्हायरल

Nagpur Police Video : नागपुरात एक पोलीस शिपाई दगडाने कारच्या काचा फोडत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातला असून काल मंगळवारी रात्रीची ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे.

Prashant Patil

नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातल्या एका नामांकित कॅफेजवळ रात्री पार्क असलेल्या एका कारमध्ये एक जोडपं येऊन बसलं. त्यांनी माघारी जाण्यासाठी कार रिव्हर्स घेतली. नको ते घडलं, पाठीमागून एक पोलीस शिपाई दुचाकीवर जात होता. कार रिव्हर्स घेताना पोलीस कर्मचाऱ्याला मागून धडकली आणि तो कर्मचारी दुचाकीसह खाली पडला.

पोलीस कर्मचाऱ्याला राग आला आणि त्याने रागात कारमध्ये बसलेल्या जोडप्यांना शिव्या देत बाहेर येण्यास सांगितलं. मात्र, ते जोडपं भीतीपोटी बाहेर काही नव्हतं. हे पाहून पोलीस शिपायाला अजून जास्त राग आला. रागाच्या भरात पोलीस शिपायाने तिथेच असलेला एक मोठा दगड उचलत कारच्या काचा फोडल्या. मात्र, कार चालक न थांबता कार घेऊन वेगाने निघून गेला. गाडीला नंबर प्लेट नसल्याने तो कार चालक नेमका कोण होता? कोण हे कळलेलं नाही. दरम्यान, त्या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या काही नागरिकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT