Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात

Nagpur Man Assaults Police: दारू पिताना पोलिसांनी हटकल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने पोलिसांवरच शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

नागपूरमधून एक धक्कादायकद घटना समोर आली आहे. दारू पिताना हटकल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने पोलिसांवरच शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीचे नाव अंकित गोस्वामी असे आहे. तो नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. सोमवारी रात्री तो झिंगाबाई टाकळी येथील जुन्या वस्तीतील गीतांजली गार्डन परिसरात आपल्या मित्रासोबत दारू पित होता. त्यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी त्याला पाहून हटकलं. अकिंत आधीच दारूच्या नशेत होता. त्याला राग अनावर झाला.

अंकितने संतापाच्या भरात पोलिसांशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच पोलिसांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोबाईल व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मित्र आणि दोन महिला नातेवाईकांनी आरडाओरड करत अंकितला गाडीतून जबरदस्तीने खाली उतरवले.

यानंतर अंकितने पुन्हा पोलिसांवर हल्ला करत मारहाण केली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मानकापूर पोलिस ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT