Nagpur Police Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: ब्राऊन शुगरच्या 32 पुड्यांसह महिलेला अटक

ब्राऊन शुगरच्या 32 पुड्यांसह महिलेला अटक

मंगेश मोहिते

नागपुर : नागपुरातून तडीपार असलेल्या महिलेला कपिलनगर पोलिसांनी ब्राऊन शुगरच्या 32 पुड्यांसह अटक केली. तसेच तिच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली. यांच्यावर नागपूर (Nagpur) शहरात ड्रग्स विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चंदा ठाकूर आणि अब्दुल लतीफ असे या आरोपींची नावे आहेत. (Nagpur News Today)

चंदा ठाकूर आणि तिचा सहयोग अब्दुल लतीफ हे अनेक वर्षांपासून अमली पदार्थ तस्करीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे (Crime News) सुद्धा दाखल आहेत. कपिलनगर (Police) पोलिसांनी या दोन्ही आरोपींना पुन्हा एकदा ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. कपिलनगर पोलीस रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगवर असताना त्यांना एक संशयित गाडी आढळून आली. त्या गाडीचा पाठलाग केला असता ती थांबत नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी पाठलाग सुरू केला.

रात्री पोहचविल्‍या ग्राहकांपर्यंत

पुढे जाऊन त्या गाडीला थांबवले असता त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष मिळून आला. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ ब्राऊन शुगरच्या 32 पुड्या मिळाल्या. त्यांना विचारपूस केली असता आम्ही हे ग्राहकांपर्यंत पोहचवत इथपर्यंत आलो असल्याच त्यांनी सांगितले. मात्र कोणाला दिल्या हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितले नाही. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT