Panipuri Plan Saam tv
महाराष्ट्र

Panipuri Plan : लाडक्या बहिणींना लाइफटाइम ऑफर; ६० रुपयांत पोटभर पाणीपुरी...

Nagpur News : मोठ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देतात. त्यानुसार पाणीपुरी प्रेमींसाठी विक्रेत्याने वेगवेगळे प्लॅन तयार करत एक दिवस, महिना आणि एक वर्षांसाठी प्लॅन दिले आहेत

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी पाणीपुरीच्या गाडीवर महिलांची अधिक गर्दी असते. साधारण १५ ते २० रुपये प्लेट असे दर आहेत. मात्र नागपुरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने चक्क मोबाईल कंपनीप्रमाणे पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी प्लॅन तयार केले आहेत. यात लाडक्या बहिणींसाठी वेगळा प्लॅन असून अनलिमिटेड आजन्म पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी ९९ हजाराचा प्लॅन ठेवला आहे. 

टेलीकॉम कंपनी प्रमाणे नागपुरात पाणीपुरी प्रेमींना प्लॅन देणारा सध्या जय दुर्गा अनलीमिटेड गुपचूपवाला जोरदार चर्चेत आहे. अनेक मोठ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. त्यानुसारच पाणीपुरी प्रेमींसाठी या पाणीपुरी विक्रेत्याने वेगवेगळे प्लॅन तयार करत एक दिवस, महिना आणि एक वर्षांसाठी विशिष्ट असे प्लॅन आखत त्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. 

नागपुरात पाणीपुरी विक्रीसाठी आलेले विजय गुप्ता हे मुळचे यूपी मधील असून त्यांची तिसरी पिढी नागपुरात पाणीपुरी विकतात. वर्धा रोडवरील गोरक्षणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा खाली रोज पाणीपुरीचा ठेला लावून विक्री करत असतात. त्यांनी पाणीपुरी खवय्यांसाठी एक दिवस, एक महिना, एक वर्ष आणि आजन्म पाणी पुरी खाणाऱ्यासाठी वेगवेगळ्या प्लॅन ठेवून पाणीपुरी प्रेमींना आकर्षित करत आहे.

लाडक्या बहिणींसाठी ६० रुपयांचा प्लॅन 

पाणीपुरी खाण्याची आवड असणाऱ्यांना आजन्म अनलिमिटेड गुपचूप पाणीपुरी खाऊ शकतात. यासाठी चक्क ९९ हजार रुपयांचा प्लॅन ठेवला आहे. एकदा ९९ हजार रुपये भरल्यानंतर सदरची व्यक्ती अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकणार आहे. तर राज्यात सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असून याच अनुषंगाने या पाणीपुरी विक्रेत्याने लाडक्या बहिणीसाठी ६० रुपयात पोटभर पाणीपुरी प्लॅन दिला आहे. अर्थात महिलांसाठी मनसोक्त पाणीपुरी खाता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT