Nagpur News  Saam Tv
महाराष्ट्र

Nylon Manja : नॉयलॉन मांजा ठरला जीवघेणा! नागपुरात दोघांचे बळी, ५० हून अधिक जखमी

नागपुरातून नायलॉन मांजामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत.

संजय डाफ

Nagpur News : नागपुरातून नायलॉन मांजामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. नागपुरात नॉयलॉन मांजामुळे दोघांचे बळी, तर ५० पेक्षा अधिक जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत. नॉयलॉन मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटनेमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Latest Marathi News)

नागपुरात (Nagpur) नॉयलॉन मांजामुळे दोघांचे बळी गेले आहेत. तर मांजामुळे ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर नागपुरात वडिलासोबत दुचाकीने जाणाऱ्या १० वर्षीय मुलाचा गळा कापल्याची देखील घटना घडली.

वेद क्रिष्णा शाहू या दहा वर्षीय मुलाचा नॉयलॅान मांजामुळे (Nylon Manja) मृत्यू झाला आहे. बाजारात जाताना मांजा वेदच्या गळ्याला गुंडाळला दुचाकी वेगात असल्यामुळे वेदचा गळा चिरला. वेदला मानकापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वेदच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर वेद राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

तर १३ जानेवारीला धंतोलीत ध्रूव ऊर्फ वंश प्रवीण धुर्वे या मुलाचा पतंगाच्या मागे धावल्याने रेल्वेच्या धडकेत झाल्याची देखील घटना घडली होती. त्यामुळे मांजा आणि पंतगबाजी बळी जाऊ लागल्याने नागरिकांच्या चितेंत भर पडली आहे.

मुंबईत पतंगबाजीमुळे ६४ पक्षी जखमी

मुंबईमध्ये रविवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी पाहायला मिळाली. मात्र, याचा फटका पक्षांना बसला आहे. पतंगबाजीमुळे जवळपास ६४ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही कबुतरांची आहे

पतंगाच्या मांज्यामुळे जखमी झालेल्या ५७ कबुतरांवर उपचार करून त्यांना कबुतरखान्यात सोडण्यात आले. तर जखमींपैकी सात पक्षी गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोन घारी, दोन कोकिळा, दोन कबुतरे आणि एक घुबडीचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT