Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : दोन्ही भावांचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले; मध्यप्रदेशातून दोघांना घेतले ताब्यात

Nagpur News : मध्य प्रदेशातून यायचे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत बाजारपेठमधून दुचाकी चोरायचा गोरखधंदा सुरू होता. यानंतर चोरीच्या दुचाकी मध्यप्रदेशात जाऊन विक्री करायचे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपुरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे भाऊ असून यातील एकावर ४० गुन्हे दाखल आहेत. नागपुरात येऊन या दोघांनी तब्बल ३१ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. 

नागपूर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी राहुल ठाकरे आणि दिनेश ठाकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील येथील रहिवासी असून दोघेही सख्खे भाऊ आहेत. हे दोघेजण मध्य प्रदेशातून यायचे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारपेठा मधून मास्टर चाबीच्या साह्याने दुचाकी चोरायचा गोरखधंदा सुरू होता. यानंतर चोरीच्या दुचाकी मध्यप्रदेशात जाऊन विक्री करायचे.  

लहान भाऊ करायचा विक्री 

वेगवेगळ्या परिसरात जाऊन मोठा भाऊ दुभाई चोरी करायचा. यानंतर धाकटा भाऊ वाहन विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. आरोपी राहुल ठाकरे हा नागपूरमधील कळमना परिसरात मिनीमाता नगर येथे भाड्याने खोली करून राहत होता. तो कामाच्या शोधात आला होता. परंतु काम न मिळाल्याने वाहने चोरू लागला. शहरात आणि ग्रामीण भागात आठवडी बाजारात जाऊन त्या ठिकाणी असलेल्या दुचाकी वाहन मास्टर चाबीने लॉक उघडून चोरी करायचा आणि मध्यप्रदेशात घेऊन जायचा. 

१९ लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरम्यान दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस चोरट्यांच्या शोधात होते. पोलिस ३ महिन्यापासून आरोपींच्या मागावर होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातून अटक करत दोन्ही आरोपींकडून ३१ दुचाकींसह सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांकडून वाहन चोरीचे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT