Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; मुलीची सुटका करत दलाल ताब्‍यात

सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; मुलीची सुटका करत दलाल ताब्‍यात

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले. स्वतः व्यवसाय करत असलेली आणि दलाल महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली. तर यासाठी मुंबईहून (Mumbai) आलेल्या एका मुलीचे सुटका करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (Nagpur News) पथकाला गुप्त माहिती मिळाली की बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय केला जात आहे. त्यावरून पोलिसांनी (Police) सापळा रचला आणि देह व्यापारासाठी मुलीला घेऊन जात असलेल्या दलाल महिलेला अटक केली. तर त्या हॉटेलमध्ये आधीच जाऊन असलेल्या ग्राहकाला सुद्धा अटक करण्यात यश मिळाले आहे.

अनेक दलाल सक्रीय

दलाल महिला ही नागपूरच्या वेगवेगळ्या भागात मुली पुरवण्याचे काम करत असल्याचे पुढे आले आहे. त्याचप्रमाणे या महिलेसह अनेक दलाल सक्रिय असल्याचे देखील पुढे आले असून पोलीस आता त्यांची पाळमूळ शोधत आहेत. या प्रकरणात देह व्यापारासाठी मुलीला मुंबईतून बोलवण्यात आले होते. ही मुलगी गेल्या आठ दिवसापासून नागपुरात असून तिची पोलिसांनी सुटका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT