Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरात निच्‍चांकी तापमानाची नोंद; प्राणी संग्रहालयात लावले हिटर

नागपूरात निच्‍चांकी तापमानाची नोंद; प्राणी संग्रहालयात लावले हिटर

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरमध्ये सध्या हुडहुड भरणारी थंडी असून मोसमातील निच्‍चांकी तापमानाची नोंद आठवड्याच्‍या सुरवातीला झाली आहे. नागरिक (Nagpur News) थंडीपासून बचाव करण्याकरिता गरम कपडे, शेकोटीचा वापर करत आहे. (Maharashtra News)

राज्‍यात सर्वाधिक तापमान (Temperature) असलेले नागपूर (Nagpur) सध्‍या थंडीने गारठले आहे. मागील काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून आता थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्‍या मोसमातील निच्‍चांकी तापमानाची नोंद झाली आहे. महाराजबाग प्राणी संग्रहालयाने पर्यटकांसाठी प्राणीदर्शनाच्या वेळांमध्ये देखील बदल केला आहे

प्राणी संग्रहालयात हिटर

नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना थंडीपासून बचाव करण्याकरिता प्राण्यांच्या पिंजरा बाहेर हिटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री आणि सकाळच्या थंडीच्या वेळी प्राण्यांना पिंजराच्या मागील भागात आणून त्यांना हीटर मध्ये ठेवले जात आहे. सोबतच त्यांच्या पिंजऱ्यात पाला पाचोळ्याची व्यवस्था केली आहे. जेणेकरून त्यांना नैसर्गिक गर्मी मिळेल; यासोबतच त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

SCROLL FOR NEXT