Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : ओडिसातून गांजा तस्करी; नागपुरात मोठी कारवाई, २७ लाख रुपयांचा गांजा जप्त

Nagpur News : पोलिस दिसताच आरोपींनी कार आणि ट्रक वेगाने चालवत पळ काढला. मात्र सिनेस्टाइल पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. गाड्यांची झडती घेतली असता १०८ किलो गांजा आढळून आला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूरमध्ये अमली पदार्थ तसेच गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. मागील महिनाभरात तिसरी मोठी कारवाई झाली असून ओडिस राज्यातून नागपुरात आणलेला १०८ किलो गांजा जप्त करण्याची मोठी कारवाई कळमना पोलिसानी केली आहे. यात २७ लाखाचा गांजासह ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

मध्यरात्रीनंतर नागपुरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी नजर ठेवत ही कारवाई केली. एचबी टाऊन ते चिखली मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर कालीमाता मंदिराजवळ एक ट्रक उभा होता. त्यातून दोन पोते कारमध्ये टाकण्यात आले. यावेळी पोलिस दिसताच आरोपींनी कार आणि ट्रक वेगाने चालवत पळ काढला. मात्र सिनेस्टाइल पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. 

पोलिसात गुन्हा दाखल 

गाड्यांची झडती घेतली असता ट्रकमध्ये चार प्लास्टिकच्या पोत्यात आणि कारमध्ये दोन पोत्यांमध्ये मिळून १०८ किलो गांजा आढळून आला. ओडिसामधून आणलेला हा गांजा नागपुरसह सर्वच भागात पाठवला जाणार होता. पोलिसांनी या कारवाईत एकूण २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर अविनाश संजय ढोके आणि पलाश विद्याधर वानखेडे अशी नागपुरात राहणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

संबंधित माल ओडिशातून आला होता. तो माल नेमका कुणाकडून घेतला व कुणाला विक्रीसाठी नेल्या जात होता? याची चौकशी सुरू आहे. तर आरोपींविरोधात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन थंडर अंतर्गत अमली पदार्थ विरोधात पोलीस विभागाकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान यात आंतरराज्यीय रॅकेट चालत असल्याची काही लिंक आहे का? याची चौकशी सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT