Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार; नराधम बापास दुहेरी जन्‍मठेप

दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार; नराधम बापास दुहेरी जन्‍मठेप

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर विशेष सत्र न्यायालयाने एका नराधम बापाला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी बापाने बायकोच्या निधनानंतर स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर दीड वर्ष बलात्कार केला. यावर सूनवाई करताना ही शिक्षा (Crime) सुनावण्यात आली. (Live Marathi News)

आरोपी व्यवसायाने ऑटोचालक (Nagpur News) असून त्याची पत्नी गर्भवती असताना २०१९ रोजी मरण पावली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी १४ वर्षे, तर लहान मुलगी १२ वर्षे वयाची होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दोन्ही मुलींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. दोन्ही मुलींवर वारंवार बलात्कार केला. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुली सुद्धा काही बोलत नव्हत्या. मात्र त्या काही।दिवस मामाकडे राहायला गेल्या आणि परत वडिलांकडे जाण्याची त्यांची तयारी नव्हती. तेव्हा मामाने कारण विचारल्यानंतर मुलींनी सगळं मामाला सांगितले. त्यावरून मामा सोबत जाऊन त्यांनी तहसील पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना मोमीनपुरा परिसरात घडली. आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियमातील कलम ४ (२) व कलम ६ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, त्याला अन्य काही कलमांतर्गत वेगवेगळ्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT