Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय; संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय; संजय राऊत

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : उद्धव ठाकरे, शरद पवार आम्ही भेटलो असून महाविकास आघाडी आणि राज्यातील राजकारण संदर्भात चर्चा झाली. त्या चर्चेत हा विषय नक्कीच आलेला आहे; की केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. (Shiv Sena) शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं असून आमदार फोडले. शिवसेनेबाबत जे तंत्र वापरले तेच तंत्र आता काँग्रेस आणि (NCP) राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत असल्‍याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Live Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे; हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे कुठल्या प्रकारचा आहे. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे. घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणालेत.

पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंबातील घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय. अजित पवार यांच्या कुटुंबावरील चौकशीचा ससेमीरा लावलेला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो. मात्र आम्ही झुकणार नाही. (Sharad Pawar) शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मनाई आदेश जारी

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

SCROLL FOR NEXT