Misbehavior Of Lovers On Running Bike Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: आवरा रे ह्यांना!'अश्लील कार'नाम्यानंतर आता प्रेमीयुगुलाचा भररस्त्यात दुचाकीवर रोमान्स, नागपुरमधील संतापजनक VIDEO

Misbehavior Of Lovers On Running Bike: नागपुरमधून आता पुन्हा एक भररस्त्यात प्रेमीयुगुलाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आलीय. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये मागील आठवड्यात धावत्या गाडीत स्टिअरिंगवर बसून एका जोडप्याने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता दुचाकीवर अश्लील चाळे करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. नागपुरमधील एकाच आठवड्यातील ही घटना आहे. या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

भररस्त्यात प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे

उपराजधानी नागपूरात काही दिवसांपूर्वी कारमध्ये अश्लील चाळे करणारा व्हिडीओ समोर आला होता. तेच आठवडाभरात दुचाकीवर तसाच प्रकार करणारा व्हिडीओ समोर (Misbehavior Of Lovers On Running Bike) आलाय. या व्हिडिओमध्ये हर्ष उर्फ बिल्ली राजेश कहर नावाचा व्यक्ती आहे. तो कुख्यात गुंड असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तो दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर बसून प्रेयसीसोबत आशील चाळे करत सदर पोलिसांच्या हद्दीत दुचाकीवर फिरला होता, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

नागपुरातील रोमिओचा प्रताप

काहींनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला.विशेष म्हणजे बिल्ली ह्या एक महिना अगोदरच एका प्रकरणातून कारागृहातून बाहेर आला (Nagpur News) होता. सदर पोलिसांनी प्रेयसी आणि बिल्लीवर गुन्हा दाखल केलाय. काही दिवसापूर्वी धरमपेठ परिसरात अशाच पद्धतीने एक सीए आणि अभियंता प्रेयसीने कारमध्ये अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आठवडाभरातील दुसरी घटना

नागपूरमधील कुख्यात गुंडाने प्रेयसीसोबत दुचाकीवर अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलीय. अशा घटनांमुळे नागपूर पोलिसांचा आरोपींना काही धाक आहे का? असा सवाल निर्माण होत आहे. त्यासोबत शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला देखील गालबोट लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Makhana Benefits: रोज संध्याकाळी भूक लागल्यावर मखाना खल्ल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

SCROLL FOR NEXT