Minor girl torture saam tv
महाराष्ट्र

खळबळजनक..फेसबुकवरून मैत्री करत नाबलीक तरुणीवर सामूहिक अत्‍याचार

खळबळजनक..फेसबुकवरून मैत्री करत नाबलीक तरुणीवर सामूहिक अत्‍याचार

मंगेश मोहिते

नागपूर : फेसबुकवरून तरुणीशी मैत्री केली. यानंतर तिला एका फ्लॅटवर घेऊन जाऊन ४ ते ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे खळबळजनक प्रकरण गुरुवारी रात्री अंबाझरी (Ambazari) ठाण्यांतर्गत उघडकीस आले. (nagpur news minor girl was gang raped while making friends on Facebook)

संशयीत आरोपींनी २ फेब्रुवारीला तरुणीला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी पार्टी केली. यानंतर तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार अंबाझरी पोलीस (Police) स्टेशनमध्ये केली आहे. अशीच घटना तीन दिवसांपूर्वीच वाडी पोलिस ठाण्यांतर्गत लावा परिसरात एका महिलेच्‍या घरात घुसून सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली होती. आता सामूहिक अत्याचाराच्या दुसऱ्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही.

काही दिवसांपुर्वीच फेसबुकवर मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी १७ वर्ष ८ महिन्याची असून अंबाझरी ठाण्यांतर्गत राहते. काही दिवसांपूर्वी तिची फेसबूकवर (Facebook) एका तरुणाशी मैत्री झाली होती. गेल्‍या आठवड्यात २ फेब्रुवारीला तरुणाने तिला रवीनगर चौकात भेटायला बोलावले. तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन जात तेथे पार्टी केली. त्यानंतर तरुणीवर ५ ते ६ तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणानंतर तरुणी घाबरलेली होती. गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलिसात तक्रार केली.

अद्याप कोणालाही अटक नाही

सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनीता साहूही ठाण्यात पोहोचल्या. तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली. गुन्हे शाखेसह इतर ठाण्यातील डीबी स्क्वॉडही आरोपींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पोलिस या मागचा तपास करत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT