Nagpur Husband Wife Death Case Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : हृदयद्रावक! पत्नीला कर्करोग, डोक्यावर कर्जाचा डोंगर; पती-पत्नीनं आयुष्य संपवलं, मुलीलाही पाजलं विष

Husband Wife Death Case : कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पती-पत्नीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली.

Satish Daud

कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पती-पत्नीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली. सुदैवाने या घटनेत 12 वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

रिजू विजयन उर्फ विजय नायर (वय ४५) आणि प्रिया रिजू नायर (वय ३४) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मृत दाम्पत्य मूळचे केरळ राज्यातील असून मागील ४ महिन्यांपासून ते कर्करोगावरील उपचारासाठी नागपुरातील (Nagpur News) जरीपटका या भागात किरायाने खोली करून राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया रिजू नायर यांना रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली होती. त्यामुळे रिजू नायर यांनी त्यांच्यावर सुरुवातीला केरळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारात फारसा फायदा होत नसल्यामुळं रिजू आणि प्रिया हे दाम्पत्य मुलगी वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात आले.

मागील दोन महिन्यांपासून ते नागपूर येथील जरीफटका भागात किरायाने खोली घेऊन राहत होते. प्रिया यांच्यावर नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात (Nagpur Hospital) उपचार सुरू होते. दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च उपचारात होत असल्यानं रिजू नायर आर्थिक विवंचनेत सापडले होते.

दरम्यान, पत्नीच्या उपचारात जवळचे सर्व जमा पैसे संपल्यानंतर रिजू यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यामुळेच रिजू यांनी पत्नी आणि चिमुकलीला विष दिलं. त्यानंतर स्वत: देखील विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सुदैवाने या घटनेत रिजू यांची १२ वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली आहे.

दरम्यान, स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने जरीफटका भागात धाव घेऊन पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेतले. त्याचबरोबर वैष्णवी हिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पती-पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT