Fraud Saam tv
महाराष्ट्र

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक

मंगेश मोहिते

नागपूर : नोकरी आज प्रत्येकाची गरज आहे. मात्र याचा फायदा काही भामटे उचलतात आणि बेरोजगारांची फसवणूक करतात. असाच एक प्रकार नागपुरात घडला. रेल्वेत (Railway) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका सुशिक्षित बेरोजगाराची अडीच लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. (nagpur news Fraud by showing lure to get a job in railways)

2018 साली झालेल्या या प्रकारात फसवणूक (Fraud) झाल्‍याचे लक्षात आल्यावर फिर्यादी अमोल साखरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वैशालीनगर येथील रहिवासी अमोल साखरे (वय 30) हे 2018 साली बेरोजगार होते. नोकरीसाठी (Nagpur) भटकत असताना मित्र लक्ष्मीकांत लोखंडे यांच्या माध्यमातून प्रशांत मारशेट्टीवार याच्याशी ओळख झाली. माझी रेल्वेत ओळखी असून तुला देखील रेल्वेत नोकरी लावून देतो. यासाठी सात ते आठ लाख रुपये लागतील.

नोकरीसाठी दिले अडीच लाख

नोकरीची आवश्यकता असल्याने अमोलने दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. तर 28 जून 2018 रोजी जोत्‍स्‍ना देशभ्रतार यांना त्यांच्या राहत्या घरी 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर प्रशांतने अमोलला जोत्‍स्‍ना देशभ्रतार यांच्या घरी रेल्वेचे अपॉइंटमेंट लेटर दिले. तर ३ सप्टेंबर 2018 रोजी प्रशांत जोईनिंग लेटर आणून दिले. मेडिकल व ट्रेनिंगसाठी जावे लागणार असल्याचे सांगितले. उर्वरित साडेपाच लाख रुपये दिल्यावरच टीसी कीट मिळेल व जॉईन करता येईल असे प्रशांतने सांगितले. परंतु हाती जोईनिंग लेटर असल्याने अमोलने उर्वरित रक्कम दिली नाही आणि ते पत्र खोटे निघाल्यावर जरीपटका पोलीस (Police) ठाण्यात तक्रार केली. यामध्ये दोन आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT