Cyber Crime Online Game
Cyber Crime Online Game Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Cyber Crime: ऑनलाईन गेम खेळताना बहिणीच्‍या अपहरणाची धमकी; १० वर्षीय मुलाकडून लाटले १ लाख रूपये

मंगेश मोहिते

नागपूर : ऑन लाईन गेम खेळणाऱ्या १० वर्षाच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी आपल्या झाशात घेतले. त्‍याला बहिणीचे अपहरण करण्याची धमकी देत आईच्या (Cyber Crime) मोबाईलवरून ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करायला लावत १ लाख रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी (Cyber Police) दोन आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले. (Live Marathi News)

लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन गेम्सचं वेड लागलं आहे. आजची तरुणाई नेहमीच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेली असते. या ऑनलाइन गेम्समधून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच आता सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन गेमरभोवती सापळे रचण्याचे काम केले आहे. अशाच एका प्रकरणात नागपुरातील एका १० वर्षांच्या चिमुरड्याला लक्ष्य केले.

ऑनलाईन गेम खेळत असलेल्‍या लहान मुलाला त्याच्या लहान बहिणीचे अपहरण करण्याची धमकी दिली. यानंतर आईच्या मोबाईलवरून पैसे पाठवण्यास भाग पाडले. मुलाने आईच्या नकळत तिच्या मोबाईल वरून पैसे पाठविले. ही बाब लक्षात आल्‍यानंतर आईने सायबर पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT