Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: मुलांचा कारनामा पोहचला पोलिसांपर्यंत; पालकांवर झाला गुन्‍हा दाखल

मुलांचा कारनामा पोहचला पोलिसांपर्यंत; पालकांवर झाला गुन्‍हा दाखल

मंगेश मोहिते

नागपूर : उच्चभ्रू घरातील मस्तवाल युवकांनी पहाटे कारमधून शहरात हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ वायरल (Nagpur News) झाला असून तो पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत पोहचला. यानंतर (Police) पोलिसांनी कारवाई केली. यात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यात 3 मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच वाहन जप्त करण्यात आली. (Letest Marathi News)

१४ जानेवारीला पहाटे ४ वाजता सर्व युवक वेगवेगळ्या कारमधून धरम पेठेत एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी नागपूर शहरातील रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाहनाच्या छतावर बसून त्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली. एक ते दीड तास विद्यार्थ्यांचा हा गोंधळ सुरू होता. यादरम्यान एकाने रील बनवून इंस्टाग्रामवर अपलोड केली. या रीलच्या आधारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाच्या छडा लावून आरोपी युवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

तीन मुले अल्‍पवयीन

अंबाझरी पोलिसांनी या रीलच्या माध्यमातून आरोपी विद्यार्थ्यांना शोधून त्यांची वाहन जप्त केली आहेत. 13 युवकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यातील 3 अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात सात वाहनांचा समावेश होता. त्यापैकी 5 वाहन जप्त करण्यात आली. तर दोन वाहनांचा शोध सुरू आहे. यांनी हे कृत्य मौज मस्ती सोबतच दहशत निर्माण करण्यासाठी केले असावे; असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT