chandrashekhar bawankule, jayant patil, old pension, farmers Saam Tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : स्वतःचा चेहरा आरशात बघा! जयंत पाटलांना असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे (पाहा व्हिडिओ)

सरकारची कामे पाहून महविकास आघाडीकडे केवळ सभा घेऊन टीका करणे एवढेच काम राहिलं आहे.

मंगेश मोहिते

Nagpur : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सरकार नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी कटीबद्ध आहे. दरम्यान जून्या पेन्शन याेजना (old pension scheme) संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांची दुटप्पी भुमिका असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केली. (Maharashtra News)

बावनकुळे म्हणाले जयंत पाटील हे अर्थमंत्री असताना काॅंग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्यांची अनेक भाषणं आहेत, त्यात पेन्शन याेजना बंद करा ते म्हणातहेत. सन 2005 कालावधीत पेंशन योजना बंद करावी असे बोलत होते. आता मात्र दुटप्पी भूमिका घेत आहेत. जयंत पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला पाहिजे मगच मागणी केली पाहिजे अशी टीका बावनकुळेंनी जयंत पाटील यांच्यावर केली.

मतांचा राजकारणासाठी जुनी पेन्शन योजनेला विराेधक पाठिंबा देत आहेत असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले. ते म्हणाले सरकारच्या विराेधात रान पेटवून सरकारी कर्मचा-यांची मते मिळतील अशी आशा विराेधकांना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. बजेट मधून लोकांना एक रुपयात पीक विमा पुढील वर्षपासून मिळणार आहे. हा मोठा लाभ लोकांना होत आहे. एकनाथ शिंदे यांची सभा शक्ती प्रदर्शनासाठी नव्हती. खरे शिवसैनिक त्या सभेत आले होते. उद्धव ठाकरे यांची सभा शक्ती प्रदर्शनासाठी होती. महविकास आघाडीचा सभा घेणे हाच उद्देश आहे असेही बावनकुळेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Accident : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, रेसिंग दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

SCROLL FOR NEXT