Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: बहीण-भावाची ताटातूट! तायडे तुला ओवाळणी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणत संपवलं जीवन

Nagpur Crime News: एका भावाने आपल्या बहिणीला दिवाळीची ओवाळणी देता न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur:

दिवाळी सणाला प्रत्येक बहीण आपल्या माहेरी जाते. माहेरी गेल्यावर भाऊबिजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या ताईला पैशांच्या स्वरुपात ओवाळणी देतो. मात्र एका भावाने आपल्या बहिणीला दिवाळीची ओवाळणी देता न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूरच्या (Nagpur) इंदोरा परिसरात ही घटना घडलीये. राहुल सोमकुवर असं मृत युवकाचं नाव आहे. जरीपटका पोलिसांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, राहुल एक बेरोजगार तरुण होता. गेल्या काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. मात्र त्याला कुठेच यश मिळत नव्हतं. हातात पैसे नसल्याने तो मोठ्या नैराश्यात होता.

या दिवळीनिमित्त लग्न झालेली बहीण (Sister) घरी आली होती. वर्षाने बहीण घरी आल्याने घरी आनंदाचं वातावरण होतं. मात्र पैसे नसल्याने घरात दिवाळीचं एकही फराळ बनवता आलं नाही. भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळलं होतं. त्यावेळी माझ्याकडे तुला ओवाळनी देण्यासाठी पैसे नाहीत, असं भाऊ म्हणाला. तसेच आसवांनी त्याचे डोळे बदबदले.

भावाची मानसीक अवस्था पाहून बहिणीने त्याची खूप समजूत काढली. मात्र बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीमुळे तो जास्त खचला होता. अशात घरी आलेल्या बहिणीला साडीचोळी आणि ओवाळनी देण्यास पैसे नसल्याने भावाने रात्री सर्व झोपलेले असताना आत्महत्या केली.

त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेची माहिती कुटुंबियांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला भाऊ आपल्याला अशा पद्धतीने सोडून जाईल याची बहिणीला काहीच कल्पना नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT