Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : नागपूर मविआमध्ये बिघाडी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांचा प्रचार

Nagpur News : रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: बऱ्यचशा मतदारसंघात बंडखोरी झाल्याने पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करण्याचे सांगितले जात आहे. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत. 

नागपूरच्या (Nagpur) रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र तरीही काँग्रेसचे नेते पूर्ण शक्तीने बंडखोर उमेदवाराचा प्रचार करत (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मत मागत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागताना दिसले. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात झाली आहे का? असे चित्र या प्रचार सभेमुळे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT