Anil Deshmukh Bail Plea Reject Latest News In Marathi SAAM TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh News: माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील बडा नेता.. अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

Anil Deshmukh News: गृहमंत्री असताना माझ्यावर जे १०० कोटींचा आरोप झाले ते एका पक्षाने करायला लावले असा खळबळजनक गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणातील चांदीवाल अहवाल जनतेसमोर आणला नाही, तर कोर्टात जाणार असल्याचा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २ मार्च २०२४

Anil Deshmukh Press Conference:

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री असताना माझ्यावर जे १०० कोटींचा आरोप झाले ते एका पक्षाने करायला लावले असा खळबळजनक गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच सरकारने या प्रकरणातील चांदीवाल अहवाल जनतेसमोर आणला नाही, तर कोर्टात जाणार असल्याचा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

"गृहमंत्री असताना माझ्यावर जे १०० कोटींचा आरोप झाले. ते एका पक्षाने करायला लावले. मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चौकशी करण्यासाठी पत्र दिलं होते. माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा दीड वर्षापूर्वीचं रिपोर्ट आलाय. मात्र या सरकारने तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नाही. मी राज्यपालांना देखील पत्र लिहिलं. मात्र त्यांनी देखील यात लक्ष घातलं नाही, अधिवेशन संपलेल असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा," असे अनिल देशमुख म्हणाले.

तसेच "हा अहवाल सादर होऊ नये, यामागे विदर्भातीलच मोठे नेते आहेत. वेळ आल्यावर नाव सांगेल. माझा पक्ष माझ्यासोबत आहे. ३ वर्षांपूर्वी मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एफेडेविट केले असते तर माझ्यावर कारवाई झाली नसती. त्यातील ४-५ मुद्दे असे होते, त्याच दिवशी सरकार पडले असते," असा खळबळजनक दावाही अनिल देशमुख यांनी केला.

"महाराष्ट्रातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला एफेडेविट करून देण्यास सांगितले. ते म्हटले की तुम्ही एफेडेविट करून द्या, ईडी सीबीआय चौकशी होणार नाही. मला माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्यास सांगितले होते. मी ते केले असते तर सरकार कोसळलं असते. याबाबतची माहिती योग्यवेळी सादर करणार आहे. पेनड्राइव्ह दाखवणार आहे. सरकारने चांदीवाल अहवाल जनतेसमोर आणला नाही, तर कोर्टात जाणार.." असे अनिल देशमुख म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT