Nagpur latest News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: दुध विक्रेत्यांना दणका... नागपुरात दुध भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध केले नष्ट

Nagpur latest News: नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

संजय डाफ

Nagpur News: सणासुदीच्या काळात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करत नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात राज्य सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर अशी की, सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाची प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

याच तपासणीदरम्यान नागपूर (Nagpur) जिल्ह्यात वेगवेगळ्या 9 डेअरींमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाईची विक्री होत असल्याचे आढळून आली. या नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून रामटेक (Ramtek) तालुक्यात 2250 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. तसेच काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

या धडक कारवाईने दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, तपासणी करताना काहीही गैरप्रकार आढळल्यास कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही समिती सदस्यांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Glasses Clean Tips: चष्म्यावर स्क्रॅच आलेत? मग या ७ सोप्या ट्रिक्स करा फॉलो, नव्यासारख्या दिसतील काचा

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दि.बा.पाटील यांच्या नावाची याचिका फेटाळली

Maharashtra News Live Update: खडकपूर्णा नदीतून अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंद करा, नागरिकांनी रोखला जुना मुंबई-पुणे- नागपूर महामार्ग

IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

Elbow Length Blouse Designs: लग्नसराईसाठी खास शिवून घ्या कोपरापर्यंत लांबी असलेले या 7 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स

SCROLL FOR NEXT