Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Shocking News : नागपुरातील तरुणाचा प्रताप, आधी तरुणीची छेड काढली; नंतर पोलिसांवर कुत्रा सोडला, आरोपीला अटक

Nagpur Crime News : तक्रार दाखल होताच पोलीस आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने चक्क पोलिसांवरच कुत्रा सोडला, ही धक्कादायक घटना नागपुरातील इतवारी परिसरात घडली.

Satish Daud

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूर : दहीहंडीच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत एका 37 वर्षीय व्यक्तीने आपली छेड काढल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने चक्क पोलिसांवरच कुत्रा सोडला, ही धक्कादायक घटना नागपुरातील इतवारी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

अंकुश उर्फ गुड्डू बागडी(वय 37) आणि पिंटू बागडी (वय 73) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नागपूर (Nagpur News) शहरातील इतवारी परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपी गुड्डू याने एका तरुणीची छेड काढली.

यासंदर्भात पीडित तरुणीने पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस आरोपीवर कारवाई करण्यासाठी त्याच्या घरी गेले. यावेळी गुड्डू आणि त्याचे वडील पाळीव कुत्र्याला घेऊन घराबाहेर आले. यावेळी फिर्यादी पोलीस कर्मचारी संजय साहूने आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये चल असं म्हटलं.

यावर आरोपीने नकार देत पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याने आपल्या पाळीव कुत्र्याला पोलिसांच्या अंगावर सोडले. यावेळी कुत्र्याने हाताला चावा घेतल्याने पोलीस कर्मचारी संजय साहू जखमी झाले. याप्रकरणी संजय यांनी पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची नोंद केली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी गुड्डू बागडी यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी माध्यमांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT