Nagpur Police Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: ७ लाखाचे ५३ मोबाईल हरविले; पोलिसांकडून शोध करत मूळ मालकांना परत

७ लाखाचे ५३ मोबाईल हरविले; पोलिसांकडून शोध करत मूळ मालकांना परत

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी हरवलेले ५३ मोबाईल शोधून ते मूळ मालकाच्या हवाले केले. या सगळ्या मोबाईलची (Mobile) किंमत जवळपास सात लाखांच्या घरात आहे. मात्र हरवलेला मोबाईल मिळाल्याची खुशी नागरिकांच्या चेहऱ्यावर (Nagpur News) पाहायला मिळत होती. (Tajya Batmya)

नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सीताबर्डी मार्केट आहे. या मार्केटमधून मोबाईल चोरी जाण्याचे किंवा मिसिंग होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र एकदा हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल मिळेलच याची शाश्वती फार कमी असते. मात्र पोलिसांच्या सायबर विभागाने आणि पोलिसांनी जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या सगळ्या मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून 53 मोबाईल मिळविण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी हे सगळे मोबाईल सगळी कारवाई पूर्ण करत मूळ मालकांच्या हवाले केले. यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास चांगलाच वाढल्याच चित्र पाहायला मिळते. तर दुसरीकडे मोबाईल मिळाल्याचा आनंद सुद्धा नागरिक व्यक्त करताना दिसते. त्यामुळे पोलीस सुद्धा आव्हान करतात की तुमचा मोबाईल हरवला असल्यास तक्रार करा आम्ही तो शोधून काढू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT