Kalamna Police Station Saam Tb
महाराष्ट्र

Nagpur News : शाळेत जाण्यासाठी आईने रागावले, 15 वर्षीय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

नागपूरच्या कळमना पोलीस ठाणे हद्दीतील दुर्देवी घटना

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Latest Nagpur News : शाळेत जाण्यासाठी आईने रागाविल्याच्या कारणावरून एका नववीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मुलीचे कुटुंबिय प्रचंड धक्क्यात आहेत.

२१ फेब्रुवारी रोजी तिच्या आईने तिला शाळेत जाण्याच्या मुद्द्यावरून रागावले. तसेच परीक्षा जवळ आल्याने अभ्यास करण्यासाठी सांगितले. यावरून मुलीला राग आला आणि तिने दुपारी एक वाजताच्या सुमारास कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहून तिने मुलीने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खराब होऊ लागली. तिने आईवडिलांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

तिला तातडीने नंदनवन येथील एका रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्यावर चार दिवस उपचार चालले. मात्र रविवारी रात्री २.१० वाजताच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूमुळे तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिला एक लहान बहीण आहे. या घटनेप्रकरणी कळमना पोलीस (police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT