Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock: विसर्जन मिरवणुकीतच मृत्‍यूने गाठले; झेंड्याचा रॉड विद्युत ताराला लागला अन्‌ क्षणात मृत्यू

विसर्जन मिरवणुकीतच मृत्‍यूने गाठले; झेंड्याचा रॉड विद्युत ताराला लागला अन्‌ क्षणात मृत्यू

मंगेश मोहिते

नागपूर : दुर्गा देवीच्या विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सदर घटना नागपूर (Nagpur) शेजारी असलेल्या हिंगणा भागातील एमआयडीसी पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत बालाजी नगरात घडली आहे. (nagpur News Electric Shock)

पियुष केशव कावडे असे मृत (Death) झालेल्या मुलाचे नाव आहे. पियुष हा त्याच्या घराच्या शेजारी विराजमान देवीच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत हाती झेंडा घेऊन सहभागी झाला होता. मिरवणूक बालाजीनगर येथे पोहचली. तिथे रस्त्याच्या बाजूला खांबावर असलेल्या विद्युत डिपीला लोखंडी दांडा असलेल्या झेंड्याचा स्पर्श झाला. यात (Electric Shock) विजेचा धक्का लागल्याने तो खाली कोसळला.

रुग्णालयात नेले तत्‍पुर्वीच मृत्‍यू

मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी त्याला डिंगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बंगळूरू ते हैदराबाद प्रवास फक्त २ तासांत, तर चेन्नईला पोचाल ७५ मिनिटात; हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

SCROLL FOR NEXT