Nagpur Latest News Saam TV
महाराष्ट्र

घरच्यांनी केला प्रेमाला विरोध; प्रेमी युगुलांनी उचललं टोकाचं पाऊल, प्रीयसीचा मृत्यू तर प्रियकर...

नागपूर जिल्ह्याच्या रामटेक (Ramtek) येथील एका प्रेमी युगुलांच्या प्रेमाला कुटुंबियांनी विरोध करत त्यांच्या लग्नाला नकार दिला होता.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: आपल्या मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न लावून न दिल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. असचं एका प्रेमी युगुलाच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील (Nagpur) रामटेक येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्याच्या रामटेक (Ramtek) येथील एका प्रेमी युगुलांच्या प्रेमाला कुटुंबियांनी विरोध करत त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. कुटुंबियांना या दोघांचं प्रेमप्रकरण मान्य नसल्यामुळे या प्रेमी युगुलाने विष (Poison) प्राषण करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अश्विनी उईके आणि अरुण कोडवते अशी या प्रेमी युगुलाचं नावं आहेत.

या दोघांनी विष प्राषण केल्यानंतर अश्विनीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर अरुणची मृत्युशी झुंज सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र, प्रेमाला विरोध केल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलांच्या संख्येत वाढ होत असून विद्यार्थ्यांनी अशी टोकाची पाऊलं उचलू नये असं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT