Nagpur : कर्जबारीपणामुळे संपवलं कुटुंब; बायकोसह दोन मुलांची हत्या केली स्वतःही गळफास घेतला! SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : कर्जबारीपणामुळे संपवलं कुटुंब; बायकोसह दोन मुलांची हत्या केली स्वतःही गळफास घेतला!

पतीने गळफास लावून आत्महत्या केली असून पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका घरात पती-पत्नी आणि त्यांच्या दहा व चार वर्षाच्या मुलाचे मृतदेह आढळले. पतीने गळफास लावून आत्महत्या केली असून पत्नी व दोन्ही मुलाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युनं नागपूरात (Nagpur) खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

मदन अग्रवाल या व्यक्तीनं घरातील दोन मुलं आणि पत्नीची हत्या (Murder) करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केलीय. कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेतून त्यानं हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती आहे. मदन अग्रवाल हा चायनिय स्नॅक्सचा स्टॉल चालवायचा. गेल्या काही दिवसांपासून तो दडपणात होता.

आज सकाळी घरातून कुणीही बाहेर न पडल्यानं शेजारी आणि नातेवाईकांना संशय आला. त्यामुळं पोलिसांना (Police) याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दार उघडल्यावर मदन अग्रवाल हा गळफास लावलेल्या अवस्थेत तर दोन मुलं आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. बायको व दोन्ही मुलांच्या मृतदेहांवर चाकूने वार केल्याचेही समोर आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंधन वाहतूक सुरळीत,पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात सेंसेटिव्ह त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT