१ रुपयाचा दावा: कॉंग्रेसचा किरीट सोमय्यांवर मानहाणीचा दावा दाखल Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : जिल्हा न्यायालयाकडून सोमय्यांना हजर राहण्याचे आदेश!

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात १ रुपयाचा मानहानीचा दावा दाखल केला होता. तसेच दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : साम टीव्हीवरील चर्चसत्रात भाजपचे नेते आणि माजी खासदार सोमय्या यांनी वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के वाट काँग्रेसला मिळतो, असा बिनबुडाचा खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला होता. या विरोधात लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर जिल्हा न्यायालयात 1 रुपया मानहाणीचा दावा दाखल केला. दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून एक रुपयांचा दावा करणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले होते.

यावर जिल्हा न्यायालयाने आज याचिका दाखल करून घेत सोमय्या यांना नोटीस बजावत समन्स जारी केला आहे. यावर आज नागपूर येथील दिवाणी न्यायाधीशासमक्ष सुनावणी झाली. 20 नोव्हेंबर ला पुढील सुनावणी होणार असून सोमय्या यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीवर आणि नेत्यांवर सतत आरोप करत असतात. सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करुन सत्तेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांची नाहक बदनामी करत असतात असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्यांविरोधात १ रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करून दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली.

याचिकेनुसार, मागील काही महिन्यांपासून किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात, नेत्यांविरोधात सातत्याने खोटेनाटे आरोप करून बदनामीची मोहीम उघडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात. सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या हे करत आहेत.

स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भाव ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. त्यामुळे, झालेल्या बदनामीची भरपाई म्हणून १ रुपया द्यावा, असेही याचिकेमध्ये म्हटले आहे. सर्व बाबी लक्षात घेता किरीट सोमय्या यांना न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयामध्ये स्वत: किंवा वकिलाला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT