Nagpur Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: व्यापाऱ्याचे नाव सांगत बॅकेतूनच काढले ४१ लाख रूपये

व्यापाऱ्याचे नाव सांगत बॅकेतूनच काढले ४१ लाख रूपये

मंगेश मोहिते

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी मोठ्या व्यापाऱ्याचे नाव सांगत 41 लाख रुपये बँकेतून ट्राजेक्शन करत बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा (Cyber Crime) दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. (Nagpur Cyber Crime)

नागपूर (Nagpur) शहरातील नामांकित व्यापाऱ्याच नाव सांगत (Bank) बँक मॅनेजरला फोन करून 2 करोडची एफडी करायची असल्याचे सांगितले. मात्र त्या आधी माझ्या खात्यातून काही ट्राजेक्शन करायचे आहे; ते करा असे म्हणत सायबर गुन्हेगाराने थाप दिली. यानंतर त्यांच्या खात्यातून 41 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात टाकायला सांगितले. बँकेचे जुने आणि मोठे ग्राहक असल्याने मॅनेजरने ट्राजेक्शन करून दिले.

मॅनेजर व्यापाऱ्याकडे आल्‍यानंतर फसवणूक उघड

वाधवाणी हे शहरातील नामांकित व्यापारी आहेत. त्यांचा याच बँकेतून मोठा व्यवहार होतो. त्यामुळे अर्जंट असल्याचे सांगितल्याने मॅनेजरने त्यांचे काम केले. मात्र त्यात बँकेची फसवणूक झाली. मात्र व्यापाऱ्याच्या कार्यालयात मॅनेजर पोहचल्यानंतर व्यापाऱ्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की आम्ही कुठलेही ट्राजेक्शन करायला सांगितले नाही किंवा एफडी सुद्धा करायची नाही. यावरून फ्रॉड झाल्याचे लक्षात आले. सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं लंडनमध्ये कौतुक

Girls height growth: मुलींची उंची नेमकी कितव्या वर्षी वाढणं थांबतं? जाणून घ्या योग्य वय

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT