Teacher couple found dead at their home in Revatinagar Nagpur saam tv
महाराष्ट्र

गडचिरोलीत शिक्षक म्हणून कार्यरत दाम्पत्याचा नागपुरात मृत्यू; घरात आढळले मृतदेह

Teacher Couple Found Dead : गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स राज विद्या निकेतन शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्याचा नागपुरातील रेवतीनगर येथील घरी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Bharat Jadhav

  • नागपुरातील रेवतीनगर परिसरात शिक्षक दाम्पत्याचा मृत्यू

  • मनिष प्रल्हाद गणवीर (३८) आणि सोनाली मनिष गणवीर (३५) अशी मृतांची नावे

  • - मनिष गणवीर यांना याच वर्षी पदव्युत्तर शिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती.

नागपुरातील रेवतीनगर परिसरात शिक्षक असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मनिष प्रल्हाद गणवीर (वय ३८) आणि सोनाली मनिष गणवीर (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे संचालित लॉयड्स राज विद्या निकेतन शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून त्यांनी या शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. विशेष म्हणजे याचवर्षी शाळा व्यवस्थापनाने मनिष यांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली होती.

सोनाली या गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) येथील रहिवासी होत्या, तर मनिष हे नागपूरचे रहिवासी होते. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते. मात्र, त्यांनी आपापल्या पूर्वीच्या जोडीदारांपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर एकाच शाळेत नोकरी करत असताना दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार

३१ ऑगस्ट रोजी मनिष आणि सोनाली यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर ते नागपुरातील रेवतीनगर येथील घरी राहत होते. मात्र, रविवारी सकाळी दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चहा बनवताना साखर कधी टाकावी? आधी की नंतर? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: महायुती कडून अध्यक्षपदासाठी अजित नरके यांच्या नावाची चर्चा

Best Lipstick Shades For Women: दिवाळीसाठी कोणत्याही साडीवर उठून दिसतील अश्या 5 लिपस्टिक शेड्स

वॉशिंग मशीनमध्ये साड्या धुवाव्यात की नाही?

रात्र झाली की झोप का येते?

SCROLL FOR NEXT