Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News : नागपूर हादरले; जुना वाद उफाळून आला, भररस्त्यात गाठत तरुणाला संपविले

Nagpur News : काही दिवसांपूर्वी मृतक निलेश दुपारे याचे यश गोस्वामी आणि त्याच्या मित्रांसोबत भांडण झाले होते. भांडणाचा राग मनात धरून सूड उगवत यश गोस्वामी याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन निलेशला गाठलं

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: मित्रांसोबत झालेल्या काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात असल्याने हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. याच जुन्या वादातून भर रस्त्यात गाठत तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मारेकरींचा शोध घेतला जात आहे. 

नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगाबाई घाट परिसरात भररस्त्यात रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत निलेश दुपारे असे मृत झालेल्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

रस्त्यात गाठून केला हल्ला 
दरम्यान काही दिवसांपूर्वी मृतक निलेश दुपारे याचे यश गोस्वामी आणि त्याच्या मित्रांसोबत भांडण झाले होते. हे भांडण त्यावेळी शमले होते. मात्र या भांडणाचा राग मनात धरून सूड उगवत यश गोस्वामी याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन निलेशला गाठलं. भररस्त्यात त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात निलेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मारेकरींचा शोध सुरु 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यानंतर घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलीसांनी यश गोस्वामी आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु केला. तर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही घटना पुन्हा एकदा नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT