Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News : भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; धमकी देत केलं संतापजनक कृत्य, काळीमा फासणारी घटना

याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Satish Daud

Nagpur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. महिला अत्याचाराविरोधात कठोरात कठोर पाऊलं उचलण्याची मागणी होत आहे. अशातच, नागपुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम मामाने आपल्याच १७ वर्षीय भाचीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. श्रीराम (वय ३५ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या नराधम मामाचं नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मामा श्रीराम याला दारूचं व्यसन आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वाईट नजर होती.

दरम्यान, आरोपी २० फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात तरुणी एकटीच होती. तरुणीला एकटं पाहून मामाची नियत (Crime News) फिरली. त्याने तिच्यासोबत बळजबरीने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला. यानंतर आरोपीने कोणाला सांगितले तर मी तुझा जीव घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

मामाची धमकी ऐकून मुलगी घाबरली आणि तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. आरोपीचे यामुळे मनोबल वाढले आणि आई-वडील घरी नसताना तो घरी येऊन अश्लील कृत्य करू लागला. सततच्या छेडछाडीला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस (Police) ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनंतर पाचपावली पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आता या नराधम मामाला अटक केली आहे. आपल्याच अल्पवयीन भाचीसोबत धक्कादायक कृत्य करणाऱ्या मामाचा कारनामा समोर येताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT